नवीन विद्युत ठेकेदार अनुज्ञप्ती प्रक्रिया
  1. आस्थापनेच्या नावाची मान्यता
  2. अनुज्ञप्ती अर्ज
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
  1. आस्थापनांच्या नावाचे ३ वेगळे पर्याय - मराठी आणि इंग्लिश मध्ये
  2. मालकाचा आधार क्रमांक - लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून त्वरित सत्यापित केला जाईल
  3. एका पेक्षा जास्त भागीदार किंवा संचालक असतील तर सर्व भागीदार / संचालक यांचे पूर्ण नाव आणि आधार क्रमांक
आस्थापनांच्या नावाची मान्यता मिळाल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकाल
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
  1. मालकाचे आणि पर्यवेक्षकाचे छायाचित्र आणि स्वाक्षरी.
  2. भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली असेल तर फक्त त्यांचा फोटो
  3. भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली नसेल तर सर्व भागीदार / संचालकांचे फोटो
  4. भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली असेल तर फक्त त्यांचा नावाने अधिकार पत्र.
  5. भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये सर्व भागीदार / संचालकांचे वय, वडिलांचे नाव आणि शिक्षण
  6. विद्युत पर्यवेक्षकाचे नाव, क्षमता प्रमाणपत्र क्रमांक, क्षमता प्रमाणपत्र दिल्याची दिनांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक
  7. खालील दस्तावेज. * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.
    • * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.
  1. जर अधिकाऱ्यांनी काही स्पष्टीकरण किंवा अधिकची माहिती मागितली असेल तर १५ दिवसात उत्तर देणे अनिवार्य आहे. १५ दिवसानंतर अर्ज आपोआप रद्द होईल.
  2. प्रत्येक अर्जासाठी ७२/- रुपये सुविधा शुल्क आकारला जाईल, जे ऑनलाईन लगेच भरावे लागेल. हे शुल्क विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्का व्यतिरिक्त असेल.
  3. विभागाकडून आकारले जाणारे शुल्क GRAS (https://gras.mahakosh.gov.in/echallan/) च्या वेबसाईट वर भरावे लागेल आणि त्याची प्रत अर्ज करताना अपलोड करावी लागेल.
विद्युत पर्यवेक्षक परवाना व प्रमाणपत्र प्रक्रिया
  1. परवाना अर्ज
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
  1. पर्यवेक्षकाचे छायाचित्र.
  2. आधार क्रमांक - लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून त्वरित सत्यापित केला जाईल
  3. खालील दस्तावेज. * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.